संकेतस्थळाचा पत्ता : www.google.com/analytics/
आपल्या संकेतस्थळाला भेट दिलेल्यांची पद्धतशीर नोंद हवी असल्यास गूगल ऍनलॅटिक्स हे एक चांगले माध्यम आहे. गूगलच्या अनेक मोफत सेवांपैकी ' गूगल ऍनलॅटिक्स ' ही एक अजून खास संकेतस्थळांच्या इंटरनेटवरील वास्तव्याचे आणि ते कुठून आणि किती पाहिले जाते याची नोंद ठेवण्यासाठी बनविलेली मोफत सेवा.
सर्वसाधारण पणे संकेतस्थळ बनविण्यार्यांना प्रेक्षक संख्या म्हणजेच संकेतस्थळ पाहणार्यांची संख्या ज्याला इंग्रजीमध्ये ' Hit Counter ' ची माहिती असते. Hit Counter द्वारे आपले संकेतस्थळ किती वेळा पाहिले गेले याची आणि इतर नोंद मिळते. तसे इंटरनेटवर अशी मोफत सेवा देणारी बरीच संकेतस्थळ आधीपासून उपलब्ध आहेत. या संकेतस्थळांवरील कोड आपल्या संकेतस्थळावर ठेवल्यास आपल्या संकेतस्थळावर प्रेक्षक संख्या दिसू लागते. काही संकेतस्थळावर मागिल महिन्यातील संख्या देखिल पाहता येते.
गूगलची गूगल ऍनलॅटिक्स ही तशीच पण थोडीफार वेगळी सेवा देणारी सेवा आहे. गूगल ऍनलॅटिक्सद्वारे आपण प्रत्यक्ष आपल्या संकेतस्थळावर प्रेक्षक संख्या ठेवू शकत नाही परंतू आपल्या संकेतस्थळावरील ज्या-ज्या वेबपेजवर आपण गूगल ऍनलॅटिक्सचा कोड ठेवला असेल त्या वेबपेजला इंटरनेटवर जगभरातून पाहिले गेल्याची सर्व नोंद ठेवली जाते. यामध्ये असलेल्या वैशिष्ट्यांची यादी खाली दिली आहे.